Sambhaji Bhide will be arrested in marathi

Sambhaji Bhide will be arrested in marathi

Sambhaji Bhide will be arrested in marathi

मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे आपत्य होते,करमचंद हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन ते पळून गेले, त्यामुळे मुस्लिम जमीनदार रागावले, रागावलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळून आणले, त्यांना घरी आणून त्यांच्याशी पत्नी सारखा व्यवहार केला.



त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत, त्यांचे वडील मुस्लिम जमीनदार आहेत.

 Sambhaji Bhide will be arrested in marathi 


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा विधानसभेत उचलून धरत संभाजी भिडे यांना कलम १५३ अंतर्गत अटक करण्यात यावी अशी मागणी केली.

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य ती माहिती घेऊन कारवाईचे निर्देश दिले जातील, अस सभागृहात म्हटलं.

● या प्रकरणात संभाजी भिडे यांना अटक होऊ शकते का ? 

● कलम १५३ आणि कलम १५३'अ' मुद्दा वारंवार अधोरेखित का केला जातोय ?

● हे प्रकरण, नेत्यांची मागणी आणि कायद्यातल्या तरतुदी या बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात, सगळं मन लावून वाचा. 
 'Sambhaji Bhide will be arrested in marathi'

या प्रकरणात विरोधकांनी कारवाई ची मागणी केली असली, तरी प्रकरण पुढे सरकेल ती तक्रार आल्या नंतर हा महात्मा गांधी यांच्या बदनामीचा मुद्दा असल्यानं महात्मा गांधीजींचे वंशज संभाजी भिडे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करू शकतात, अश्या वेळी कलम ४९९ अंतर्गत - फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा दाखल होतो, या कलमाअंतर्गत जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, पण हा गुन्हा जामीनपात्रही आणि अनेकदा अब्रुनुकसानीच्या केसेस कोर्टात जास्त टिकत नाहीत. पण 

■ कलम ५०० - बदनामी

■ कलम १५३ - दोन समूहात दंगल घडविण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणे,

■ कलम १५३ 'अ' - दोन समूहात दंगल घडविण्यासाठी कृत्य करणे,

या कलमांच्या आधारे भावना दुखावलेला कोणताही वक्ती संभाजी भिडे विरोधात तक्रार करू शकतो, अस कायदेतज्ञा कडून सांगण्यात आलं सोबतच सरकारकडून Suo Motu Cognizance अंतर्गत संभाजी भिडे विरोधात तक्रार दाखल करू शकते,

जर बारकाईन पाहिलं तर लक्षात येईल  पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई ची मागणी करतांना कलम १५३ व कलम १५३ 'अ' चा उल्लेख केला, ही दोन्ही कलमे काय आहेत आणि या अंतर्गत अटकेची तरतूद आहे का हे पाहूया. ----

◆ कलम १५३ - दोन समूहात दंगल घडविण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणे :-  जी अवैध असेल अशी कोणतीही गोष्ट करुन, कोणी एखाद्या व्यक्तीला प्रक्षोभित करेल आणि अशा प्रक्षोभनामुळे दंडाचा अपराध घडावा असा त्याचा उद्देश असेल किंवा तसं घडणं संभवनीय असल्याची जाणीव असेल तेव्हा कलम १५३ लागू केली जाते. 

■ दंगल न झाल्यास :- सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही,

■ दंगल झाल्यास :- १ वर्षांचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही, पोलिस स्टेशनमध्ये जामीन मिळण्याची तरतूद,

◆ कलम १५३ 'अ' - दोन समूहात दंगल घडविण्यासाठी कृत्य करणे, :- धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरुन दोन समूहांमध्ये शत्रुत्व किंवा द्वेष वाढेल अशी कृत्य करणं,सामाजिक शांतता आणि एकोपा बिघडवायला हेतु परस्पर कृती करणं असे प्रकार पुढे आले तर कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
या गुन्ह्यात ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही, गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास, कोर्टातून जामीन मिळण्याची तरतूद,

 Sambhaji Bhide will be arrested in marathi 


पण अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेनां अटक करावी अशी मागणी करतांना देशद्रोह्याच्या गुन्ह्याचा उल्लेख केला, त्यामुळे महात्मा गांधीचा अपमान केला म्हणून संभाजी भिडे यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का अश्या चर्चा सुरू झाल्या मात्र,

◆ कलम १२४ 'अ' - देशद्रोही, नुसार 
जर एखादी व्यक्ती सरकारविरोधी लिखाण,वक्तव्य किंवा अशा साहित्याचं समर्थन करत असेल, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करून संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असेल, हा गुन्हा सिद्ध झाला तर 03 वर्ष ते आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

या गुन्ह्यात राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद असली तरी महापुरुषाबद्दल वक्तव्य केलं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे महापुरुषाबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कुठला कायदा किंवा कलम आहे का, तर असं कुठलही कलम किंवा कायदा नसला तरी या संदर्भात मागणी मात्र झाली होती, 2019 मध्ये समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली खान यांनी राज्यसभेत 'prevention of insult to the father of the nation and other icons of freedom movement bill'  ( 'राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्य चळवळीच्या इतर प्रतिकांचा अपमान प्रतिबंधक विधेयक' ) सादर केलं होतं, त्यांनी अशी मागणी केली होती की महात्मा गांधी आणि इतर स्वतंत्रसैनिकांचा अपमान करणार्यांना सात वर्ष पर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा डोकवण्यात यावी, अशी मांगणी जावेद अली खान यांनी या खासगी विधायकाद्वारे केली होती, महात्मा गांधीच्या  हत्या करणार्यांचा गौरव करणाऱ्यावरही कारवाई करण्यात यावी असही या विधायकात नमूद केलं होतं, परंतु हे विधायक पास झाल नाही.  Sambhaji Bhide will be arrested in marathi 

सोबतच महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करणार्यांच्या विरोधात एक कायदा तयार करण्यात येत असल्याची चर्चा झाली होती, डिसेंबर 2022 मध्ये हिवाळी अधिवेशना दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलतांना आम्ही एक समिती तयार करत आहोत जी समिती या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेईल आणि कश्याप्रकारे आपल्याला कायदा कडक करता येईल, महापुरुषाचा अपमान कोणी करत असेल तर अश्या व्यक्तीवर टाच आणता येईल, अशाप्रकारच काम आपण येत्या काळात निश्चितपणे करणार आहोत, अस विधान केल होत मात्र आत्तापर्यंत तरी असा कायदा राज्यात अस्तित्वात आला नाही.

Sambhaji Bhide will be arrested in marathi 

या सगळ्या गोष्टी विचारात घेयल्या तर कलम ४९९,५००,१५३ आणि कलम १५३ 'अ' अंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, यातल्या काही कलम अंतर्गत त्यांना अटक ही होऊ शकते, मात्र सुप्रीम कोर्टान अर्नेश कुमार केस मध्ये ज्या गुन्ह्यात तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त सात वर्षेपर्यंत असेल अश्या गुन्ह्यात आरोपीला अटक करू नये असे निर्देश दिले होते. आशा वेळेस आरोपीला फक्त चौकशीसाठी बोलावून माहिती घेतली जाते,

संभाजी भिडे यांच्यावर जी कलमे लागू शकतात त्यातल्या एकाही कलमा अंतर्गत सात वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा होऊ शकत नाही.

त्यामुळे त्यांच्या अटकेच्या शक्यता कमी होतात, मात्र कोर्टाने असही नमूद केलं आहे की आरोपीकडून तपासावर प्रभाव टाकणं, पुराव्याशी छेडछाड करणं, साक्षीदारांना धमकवन, आणि अटके अभावी न्यायापासून दूर जाणं अश्या शक्यताचा तपास करावा, तश्या शक्यता असतील तर मात्र सविस्तर अटी लादून कारवाई केली जाऊ शकते.

त्यामुळे विरोधक मागणी करत असले तरी राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्याबद्दल कायद्यातल्या तरतुदी इतर कलम आणि सरकारची भूमिका या वरूनच संभाजी भिडेनां  अटक होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 

"Sambhaji Bhide will be arrested in marathi"

या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून सांगा...! ☺️